सौदी अरेबियाने ‘सोफिया’ या लेडी रोबोला नागरिकत्व बहाल केले आहे. तुम्हाला जर सोफियाला भेटण्याची इच्छा असेल तर येत्या शनिवारी ३० डिसेंबरला आयआयटी, पवईमध्ये नक्कीच हजेरी लावा. आयआयटीचा ‘टेकफेस्ट’ सध्या सुरू असून शनिवारी दिवसभर सोफिया आयआयटी कॅम्पसमध्ये वावरताना दिसणार आहे.
सोफिया रोबोटला तुम्ही तुमच्या मनातील कोणताही प्रश्न विचारू शकता. तुमचा प्रश्न टेकफेस्टची टीम सोफियासमोर ठेकणार आहे. सोफियाला प्रश्न विचारण्या साठी टेकफेस्टने ट्विटर कॅम्पेन सुरू केले असून युजर्स ट्विटरवर ‘#AskSophia’ वर प्रश्न पाठवू शकतात. सोफिया एक कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली रोबोट आहे.सोफियाची शरीरयष्टी नाजूक असून डोळ्यांची रचना खूपच बोलकी आहे. प्रकाशामध्ये तिच्या डोळ्यांचा रंग बदलतो.कॅमेरा आणि ‘एआय’ सॉफ्टवेअरमुळे एकदा पाहिलेला चेहरा तिचे डोळे पुढे कधीही विसरू शकत नाही.युजर्स सोफियाला हवामान, वाहतूक कोंडीविषयीचे प्रश्नदेखील विचारू शकतात.आवाजाची ओळख ठेवण्याची क्षमता असल्याने सोफिया लोकांशी अधिक चांगला संवाद साधू शकते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews